साक्री विधानसभेसाठी आता माघार नाही इंजि.के.टी. सूर्यवंशी यांनी फुंकले रणशिंग
साक्री प्रतिनिधी

साक्री विधानसभेसाठी आता माघार नाही इंजि.के.टी. सूर्यवंशी यांनी फुंकले रणशिंग.
कार्यकर्ते लागले कामाला.
विरोधकांच्या गोटात उडाली खळबळ.आता माघारीचा विषयच नाही पूर्ण ताकतीने लढणार आणि जिंकणार” साक्री विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार इंजिनिअर श्री के टी सूर्यवंशी यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. गाव भेटीतून कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
इंजि. के.टी सूर्यवंशी यांच्या मागे कार्यकर्त्यांचा गोतावळा पाहून विरोधकांच्या गोटात खळबळ उडायला लागली.
साक्री तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सगे,सोयरे यांच्याशी चर्चा करून भेटीगाठी घेत मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघात इंजि. के.टी सूर्यवंशी हेच शेतकरी, कष्टकरी, दिन दुबळ्यांचे हित जाणणारे प्रभावी नेतृत्व मानले जात असून येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.
साक्री व पिंपळनेर मंडळातील मतदारांना प्रत्यक्ष भेटून उदंड प्रतिसाद इंजिनीयर के.टी सूर्यवंशी यांना मिळत असून साक्री तालुक्याच्या जनतेची जुळलेली नाळ मजबूत असल्याने ती जमेची बाजू आहे.
साक्री तालुक्याच्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता आता हवा चेहरा नवा.
आता माघार नाही पूर्ण ताकतीने लढणार आणि जिंकणार.
साक्री तालुक्यातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद.
.