राजकीय

परळीत धनंजय मुंडेच किंगमेकर!

संपादक- प्रदीप मुंडे

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

(संपादक)

Download Aadvaith Global APP

विरोधकांच्या वायफळ वल्गना केवळ  वार्‍यावरची वाडली

राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्स पक्षाच्या कथा सर्वांनीच ऐकल्या अन् र्‍हदयाच्या चिरतरूण कप्यात साठवुण ठेवलेल्या आहेत… प्रत्यक्षात फिनिक्स पक्षी आहे की, नाही? माहित नाही, मात्र बालपणी बिंबलेल्या कल्पना विश्‍वातील त्या फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेणारा नेता अन् दाता धनंजय मुंडे साहेब हे आहेत… त्यांचा संघर्ष पाहीला की, राखेतून भरारी घेणार्‍या कल्पनेतील फिनिक्स पक्षाची आठवण येते… अशा या समाजकारण अन् राजकारणातील फिनिक्स नेतृत्वाला पराभुत करण्याच्या वायफळ वल्गना सध्या काही लोक करत आहेत… त्यांच्या या वल्गना वार्‍यावरची वावडी ठरणार असून परळीत धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा नव्हे तर विरोधकांच्या काही पिढ्यांना पुरून उरतील ईतका काळ किंग आणि किंग मेकरच्या भुमिकेत असणार आहेत.

वाल्मीक अण्णांसारखा

सारथी कुठुण आणणार?

जाती- पातीचे स्तोम माजवुण काही लोक परळीत धनंजय मुंडे यांचा पराभव करण्याच्या बाष्फळ वल्गना करत आहेत… असो, रात्रीच नव्हे तर दिवसादेखील स्वप्न पहायला काहीच अडचण नाही… स्वप्न नक्कीच पहावीत, परंतू ज्या नेतृत्वाला पराभूत करण्याची भाषा आपण करत आहोत, त्या नेत्याने कर्तृत्व, त्यांनी केलेली विकास कामे, जनसंपर्क, रोज दवाखान्यात उपचार घेणार्‍या गरीब रूग्णांपासून लहान ते अपघातातील जखमी, जाती- धर्माच्या पलिकडे जावून गोर- गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्न कार्यात अर्थिक मदत… हे फक्त धनंजय मुंडेच करू शकतात… कारण धुनर्धारी ना. धनंजय मुंडे यांचा सारथी वाल्मीकअण्णा कराड नावाचा अफाट कार्यक्षमता असलेला माणुस आहे… विरोधक जातीयवाद करतील, पाहुण्या रावळ्यांचे राजकारण करतील… प्रसंगी काही अफवाही पसरवतील… परंतु धनंजय मुंडे यांच्या तोडीचे नेतृत्व- कर्तृत्व कोणाकडेच नाही… विशेष म्हणजे वाल्मीक अण्णांसारखा नेत्यासाठी दातृत्व दाखवणारा सारथी बाजारात अथवा पैशाने विकत मिळत नाही…

डिपॉझीट जाणार की, राहणार?

याची चिंता विरोधकांनी करावी

साखर झोपेत असताना अनेकांना अनेकदा गोड अशी स्वप्न पडतात… अलीकडच्या काळातील काही घटना- घडामोडीमुळे काही लोकांना दिवसा देखील स्वप्न पडत आहेत… खरेतर स्वप्न कोणालाही अन् कधीही पडू शकते परंतू, परळीत धनंजय मुंडे यांचा पराभव करण्याचे स्वप्न ज्यांना ज्यांना पडले आहे, त्यांनी जागे होऊन आपले डीपॉझीट जप्त होणार? की राहणार? याचा विचार करावा…

 

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये