राजकीय
राज्यातील शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक
प्रतिनिधी

- राज्यातील शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अब्दुल सत्तार, अनिल पाटील आदी उपस्थित होते. शेतमालाला योग्य मोबदला मिळावा ही राज्य व केंद्र सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवणे, तसेच निर्यातीस परवानगीबाबत केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणूकीबाबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली आहे. राज्यात ११ हजार ५०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट असल्याने कृषिपंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबरअखेरपर्यंत दूर करण्यात येतील – उपमुख्यमंत्री श्री. पवार