
एक गोस्ट आहे कि गेल्या तीन टर्म आम्ही तुम्हला मतदान केला… मान्य आहे कि मतदान केला…
पण एक गोस्ट लक्ष्यात ठेवा कि जितके फक्त वंजारी गेवराई, माजलगाव आणि आष्टी-पाटोदा मध्ये मराठा उमेदवाराला मतदान करतात ( कोणत्या का पक्षाचा असेना उमेदवार मराठा असावा ) व करत आलेले आहेत तितके सुद्धा प्रस्तापित समाज वंजारी उमेदवाराला मतदान करत आलेला नाही….
एक अलिखित नियम होता कि तुम्ही लोकसभेला प्रतिनिधित्व द्या, आम्ही तुम्हाला विधान सभेला विरोध न करता प्रतिनिधित्व देऊ… बरेच वंजारी व धनगर समाजातील नेते क्षमता असताना डावलण्यात आले कारण प्रस्थापित समाजाला प्रतिनिधित्व भेटावं म्हणून….
माजलगाव मध्ये आम्हाला जसे कळते तसे दोन्ही पक्षा कडून फक्त आणि फक्त प्रस्थापित समाजाचा उमेदवार उभा राहतो, तरी ह्या गोष्टीला कोणीच आणि कधीच विरोध नाही केला… कारण ही सामाजिक घडी बसलेली होती आणि ती विस्कटावी हा obc समाजाचा कधीच हेतू नव्हता….
आमच्या अक्ख्या हयातीत जसे कळते तसे आम्ही दादाला मतदान केले… दादा भाजप मध्ये होते तेंव्हा ही केले आणि दादा राष्ट्रवादी मध्ये होते तेंव्हा ही केले… आम्हला त्यांच्या कडून कधी न्याय नाही मिळाला पण एकाच आशावाद होता कि आमचे वरचे नेतृत्व सक्षम आहे व त्यांच्या सावलीत आमचे भागून जाईल…
आम्हाला भीती फक्त आमच्या उसाची… गावात मतदान नाही झाला तर दादा ऊस नाही नेणार…
तुम्हाला OBC चा एकही नेता किंवा कार्यकर्ता मोठा झालेला देखवत नाही जर तुमच्या विचाराशी सहमत नसेल तर… जगा आणि जगू द्या ही नीती तुम्ही कधीच वापरली नाही….
OBC समाजाच्या , विशेष करून वंजारी समाजाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना तुम्ही माजलगाव तालुक्यात कधीच सुखाने काम करू दिले नाही तरीही सर्वांनी सहन केलाच आहे ना (मतदार संघात नाही म्हणत )….
वंजारी समाजाचे जाऊ द्या इतर OBC जसे कि बंजारा आणि धनगर समाज तुमच्या मागे खंबीर उभा राहिला गेली २५ वर्षे त्यांना तरी तुम्ही कुठं न्याय दिला आहे? एखाद दुसऱ्या फक्त प्रस्थापितला पद दिले असेल फक्त मतावर डोळा ठेवून….
पण ह्या लोकसभेत असे चित्र तयार करण्यात आले कि प्रस्थापित समाजावर पिढ्या न पिढ्या अन्याय होत आलेला आहे?
अन्याय फक्त तुमच्यावरच झाला का ?
इतर समाजावर नाही का होत? तरी ते सोबत कसे उभे राहिले…
ते लहान लहान गट आहेत म्हणून संघटित नाहीत व त्यांचे उपद्रव मूल्य नाही म्हणून अन्याय करत राहायचे का?…
आम्ही कोण हो अन्याय करणारे? आम्ही तर उपेक्षित….
माजलगाव मतदार संघातील सगळे महाविद्यालये तुमची, कर्मचारी तुमचे (पक्ष कोणता का असेना), सर्व साखर कारखाने तुमची, सगळे कर्मचारी तुमचे, सगळे सरसकट गुत्तेदार तुमचे आणि यंत्रणाही तुमची, सर्व शाळा आणि शिक्षण संस्था तुमच्या आणि कर्मचारी पण तुमचेच (पक्ष कोणता का असेना) मग अन्याय करणारे आम्ही कसे?, आम्ही तर तुमचे हुकून चुकून झालेले वर्ग ४ कर्मचारी ते पण मतदानावर डोळा ठेवून झालेले…
आमची लायकी फक्त खांद्यावर हाथ टाकायची आणि दोन गोड शब्द बोलायचे… आमचा भोळा भाबडा आणि गरीब OBC कार्यकर्ता आभाळात ….. माल खाणारे तर तुमीच होते ना…
मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे … प्रस्थापित सोडले तर इतर समाज गरीब आहे… पण ही मागणी कधी पर्यंत रास्त होती? ही मागणी जो पर्यंत EWS लागू नव्हते तो पर्यंत रास्त होती…. आता EWS असताना सरसकटची मागणी कितपत योग्य आहे? ह्यात प्रस्थापित आणि सर्व OBC समाजचे नुकसान आहे हे कसे दिसत नाही प्रस्थापित समाजातील विचारवंतांना?
तुमच्या म्हणण्या नुसार ३० ते ४० टक्के समाज OBC मध्ये आला आहे तेंव्हा OBC चे मेरिट EWS जास्त लागते आहे , जेंव्हा सगळा समाज येईल तेंव्हा हाहाकार माजेल महाराष्ट्रात…. मग पुन्हा ओरड सुरु होईल कि EWS मधून वरच्या पोस्ट सगळा ब्राह्मण समाज खात आहे आणि खालील पोस्ट मुस्लिम समाज खात आहे….
तुमची मागणी मराठवाडा पूर्ती मर्यादित होती, आणि शिंदे सरकार निझाम गॅझेट लागू करून सरसकट मराठवाड्याला OBC लागू करायला तयार होते , त्याला पण तुम्ही विरोध केला…. ह्यातून फक्त आणि फक्त तुमची राजकीय महत्वकांक्षा दिसत आहे… तुम्हला OBC समाजाचा ग्राम पंचायत सदस्य पण झालेला देखवत नाही… आम्ही केला म्हणता… आम्ही नाही का करत तुम्हाला मतदान?
जसा मतदार संघ झालाय तसा प्रस्थापित समाजाचा प्रतिनिधी आहे…. स्वतःला जातीवादी म्हणून घ्यायचे नसेल तर द्या बघून संधी उपेक्षित समाजाच्या पोराला….