
खा.शरदचंद्र पवारांचे सोशल इंजिनिअरींग माजलगाव मतदार संघात देणार ओबीसी उमेदवार धारूर (प्रतिनिधी )
राजकारणातील चाणक्य म्हणून देशभरात ओळख असलेले खा.शरदचंद्र पवार हे सोशल इंजिनीअरींग करण्यात माहीर आहेत.लोकसभेला आपल्या पक्षाला सर्वात कमी जागा घेऊन सर्वात जास्त टक्केवारीने पास होण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
महाराष्ट्रातील महा विकास आघाडी चा प्रयोग ही खा.शरदचंद्र पवार यांचाच आहे हे सर्व देशाला माहीत आहे.
आगामी विधान सभा निवडणूकीत महा विकास आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून खा.शरदचंद्र पवार हे स्वत: च्या पक्षाकडून कमी जागा लढवतील व जास्त जागा निवडून आनतील हे मात्र नक्की.
बीड जिल्ह्यातील राजकारण हे ओबीसींच्या भोवती फिरते.माजलगाव मतदार संघ हा ओबीसी बहूल मतदार संघ आहे.ओबीसी ला सोडून येथे कोणताही पक्ष राजकारण करू शकत नाही.
सध्या ओबीसींची आक्रमकता पाहता येत्या विधानसभा निवडणूकीत तर माजलगाव मतदार संघाचा आमदार ओबीसींचाच होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
राजकीय वातावरण बदलाचा अंदाज घेण्यात खा.शरदचंद्र पवार हे वस्ताद आहेत.म्हणून या वेळी माजलगाव मतदार संघात ओबीसी चेहराच उमेदवार द्यावा लागेल या मतांपर्यंत खा.शरदचंद्र पवार हे आलेले आहेत अशी माहीती अधिकृत सुत्रांकडून मिळालेली आहे.
सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा सर्व समावेशक सौम्य ओबीसी चेहरा कोण याची चाचपणी चालू आहे.लवकरच हा चेहरा समोर येऊन खा.शरदचंद्र पवार हे आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करतील.
एकंदर या वेळी माजलगाव मतदार संघाचा आमदार ओबीसीच असेल असे चित्र निर्माण झालेले आहे.
खा.शरदचंद्र पवार यांच्यावर निष्ठा ठेवून बीड जिल्हा परिषदे मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पदावर सेवा करून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेऊन समाजकारण व सक्रीय राजकारण करणारे उच्च शिक्षित व स्वच्छ प्रतीमेच्या प्रा.ईश्वर मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.