
महाराष्ट्रात शपथेवर बोलणे झाले महाग,
शंभर रूपयाचा बॅांड झाला पाचशेला,
लाडक्या बहीणींची वसूली भाऊजींकडून-सरकार हे बरं नव्हं – प्रा.ईश्वर मुंडे
किल्ले धारूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून अभद्र महा युती सरकारने एकीकडे मोफत योजनांची खैरात सुरू केली आहे तर दुसरीकडून विविध गोष्टींचे भाव वाढवून वसूली करून जनतेला भुरळ पाडण्याचा प्रकार चालू आहे हे सुजान जनतेला दिसत आहे.या मोफत योजना म्हणजे एका हाताने द्यायचे व दुसऱ्या हाताने परत घ्यायचे यालाच *रांगत जाते अन सांगत येते असे म्हणतात* अशी खरमरीत टिका राष्ट्रवादी कॅांग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी सेल चे राज्य प्रमुख प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रा.ईश्वर मुंडे पुढे म्हणाले की,राज्यातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या योजना राबवणे बद्दल कोणत्याही पक्षाचे दुमत नसते परंतू राज्य दिवाळखोरीत आसताना कुठल्याही ठोस उत्पन्नाची तरतूद नसताना फक्त मतांवर डोळा ठेवून रीन काढून सन चालला आहे हे योग्य नाही.
जन कल्याणाच्या विविध योजना राबवून समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास करणे हेच सरकारचे कर्तव्य आसते परंतू या साठी राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या कायम स्वरूपी असाव्यात लागतात,या योजनांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कायम स्वरूपी उत्पन्नाची तरतूद करणे आवश्यक आसते हे न करता जीवन आवश्यक वस्तूंचे भाव वाढवून मोफत योजनांची खैरात करणे योग्य नाही.
शेती मालाला योग्य भाव न देता तो कमी करणे,दूधाला भाव वाढ न देणे,जनावरांचे खाद्य, जनतेचे खाद्य पदार्थ तसेच जीवन आवश्यक वस्तूंचे भाव वाढवणे एवढेच नाही तर मद्य पेयांचे भाव वाढवून पैशांची वसूली करायची हे जनता उघडया डोळ्यांनी पहात आहे.
महाराष्ट्रातील महीलांना सुरक्षा,संरक्षण व हाताला काम पाहीजे, त्यांच्या पतीला सन्मानाचा रोजगार पाहीजे,मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण पाहीजे हे न करता शाळा बंद करणे, कंत्रांटी शिक्षकांची भरती करणे, काम करत असलेल्या शिक्षकांचा अनुदान टप्पा वाढ न देता,शेतकऱ्यांचे विविध विभागाचे अनुदान न देता,अनेक विभागांच्या विविध लाभार्थ्यांचे अनुदान न देता फक्त लाडकी बहीन,लाडकी बहीन म्हणत त्यांच्या मतांवर डोळा ठेवून जनतेच्या पैशाची खैरात करून पण आता महा युती सरकार ची खैर नाही कारण निवडणूकीत लाडक्या बहीणी लाडक्या भाऊजींना किंवा लाडक्या भाच्याला विचारूनच मतदान करतात हे लक्षात ठेवा.अशी कान पिळणी प्रा.ईश्वर मुंडे यांनी केली आहे.