
मुंबई प्रतिनिधी
रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अती दक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते यावेळी दीर्घ आजाराने रतन टाटा यांचं निधन झालं
भारतातल्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी व आदराचं नाव काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे भारतासह जगभरातील उद्योगक्षेत्रावर शोकाकुळ पसरली आहे. टाटा समूहाचे नावं हे विश्वासासाठी ओळखलं जातं.
रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती व टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते.
१९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. आणि२०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते आणि तसेच ते पद्मभूषण २००० व पद्मभूषण २००८ या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे प्राप्तकर्ते होते.