
विकास कामेही करता येईनात.
माझा पुढारी प्रतिनिधी :- चौंडी ग्रामपंचायत चे जलजीवन चे काम गेली दोन अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेले असून अजूनही सदरचे काम पूर्ण झालेले नाही,त्याकडे कंत्राटदाराचे व गावातील लोकप्रतिनिधींचे व गावकऱ्यांचे देखील सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. कारण आज पर्यंत जलजीवनच्या कंत्राटदाराला गावात कोणीही बोलावून घेतले नाही, व त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे की चांगले झाले आहे किंवा सदरचा कंत्राटदार लवकर काम का करत नाही, याबाबतची चौकशी कोणीही केलेली दिसून आले नाही.
गावातील सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते उखडलेले आहेत, टाकीचे बांधकाम पाईपलाईन पूर्ण झालेली असून देखील सदर कामाची टेस्टिंग आजतागायत करण्यात आलेली नाही. तसेच जल जीवन चे काम केल्यानंतर पाईपलाईन मुळे खराब झालेले रस्ते संबधित कंत्राटदाराने पूर्णपणे दुरुस्त करून देणे बाबतचा समावेश त्यांच्या अंदाजपत्रकात असून देखील सदरचे रस्ते कंत्राटधारा मार्फत दुरुस्त का केले जात नाहीत,
याकडे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे चौंडी गावातील नव्याने मंजूर झालेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते देखील करता येत नाहीत. कारण आज नव्याने सिमेंटचे रस्ते तयार केले आणि उद्या जलजीवन चे टेस्टिंग करत असताना एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे किंवा तिला गळती झाल्याची जर दिसून आले तर पुन्हा नव्याने तयार केलेले रस्ते उखडण्याची वेळ येऊ शकते.
सध्या गावातील सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत. नागरिकांना रस्त्याने चालताना देखील त्रास होत आहे तसेच गावातील अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झालेली आहे व निमुळते रस्ते झालेले आहेत. गावात पडीक झालेली घरे, रिकामे प्लॉट्स, व तुंबलेल्या नाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची देखील भीती निर्माण झाली आहे.
याबाबत चोंडीच्या सरपंच राजश्री मुंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जल जीवन च्या कामाचे (पाण्याचे) टेस्टिंग झाल्याशिवाय व व गावातील अतिक्रमणे हटवल्याशिवाय विविध विकास कामे करता येणार नाहीत. तसेच सध्या गावांमध्ये अनेक विविध प्रकारच्या जसे की डीपिडीसी/2515/3054/9010 आमदार/खासदर निधी मधुन अनेक विकास कामे मंजूर झालेली आहेत. तसेच चोंडी सोनीमोहा रोड चे काम मंजुर झालेले असून पुढील आठवड्यात सदरच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.
धारूर तालुक्यातील थेटेगव्हण/काटेवाडी या गावांचा वेगाने विकास कसा आणि का होत आहे हे चोंडी गावकऱ्यांना माहिती व्हावे म्हणून सदरच्या गावांचा गाव भेट दौरा काढण्यात येणार आहे. सदरची गावे विकसित होण्याचे कारण म्हणजे तेथील सर्व गावकऱ्यांनी व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पहिल्यांदा गावातील अतिक्रमणे हटवली, तसेच अत्यावश्यक ठिकाणीच कामे करण्याबाबत एक मताने विचार केला . सर्वांनी पक्षभेद एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येऊन काम केले. म्हणून थेतटेगव्हण ग्रामपंचायत ही जिल्हास्तरावर झळकली आणि त्यांना रुपये 50 लाखाचे बक्षीसही मिळाले.मात्र चोंडी गावामध्ये कुठलेही काम करायचे म्हणले तर त्याला पहिल्यांदा प्रचंड प्रमाणात एकमेकांच्या द्वेषा पोटी जास्त विरोध होतो किंवा एखादे काम हाती घेतले तर त्याच्यामध्ये अडवणूक कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात.आणि अशी अडवणूक करणारे लोक प्रथमता पुढे येतात.आणि त्यामुळे कामे रखडतात. तसेच कोणी गावातील एखाद्याने उत्स्फूर्तपणे वरिष्ठ स्तरावरून धडपड करून काम मंजुर करून आणले तर त्याला प्रचंड विरोध करणाऱ्यांची संख्या देखील चोंडी गावामध्ये जास्त आहे. त्यामुळे ते लोक पुन्हा पुढे येत नाहीत, म्हणून काही गावातील विकास कामे रखडली आहेत. यासाठी गावकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे, विकास कामांना विरोध न करता प्रोत्साहन देऊन सदरची कामे दर्जेदार कशी होतील व योग्य रीतीने नियमानुसार कशी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. असेही त्यांनी सांगितले.