ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

प्रतिनिधी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

 

Download Aadvaith Global APP

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे..

 

योजनेचे लाभ स्वरूप

 

सदर योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30 हजार इतकी असून खर्च शासनाकडून करण्यात येईल.

 

योजनेच्या पात्रतेचे निकष

 

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाख, कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापी रूपये 2.50 लाख हजार पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरशेन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे. लाभार्थी प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावा जसे टि.बी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, करोनरी अपुरेपणा, करोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजार नसावेत.

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 

विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज. आधार कार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे/ केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, अटी व शर्तीचे पालन हमीपत्र.

 

अधिक माहितीसाठी संपर्क

 

संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा.

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये