कृषीमंत्री मुंडे यांनी आष्टीला पाच कोटी ७५ लक्ष रुपयाचे कृषी भवनाला दिली मंजुरी-आ. आजबे ■
आष्टी प्रतिनिधी

आ. आजबे यांच्या प्रयत्नाला यश
कृषीमंत्री मुंडे यांनी आष्टीला पाच कोटी ७५ लक्ष रुपयाचे कृषी भवनाला दिली मंजुरी-आ. आजबे
शेतकऱ्यांसाठी विविध योजना महाराष्ट्र राज्य कृषी विभागा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत राबवल्या जातात त्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकाऱ्यांचे कार्यालय असावे व शेतकऱ्यांची हेडसांड होऊ नये या बाबींची दखल घेत आ बाळासाहेब आजबे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषीभवनासाठी कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यास आज पाच कोटी ७५ लाख रुपयांच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली
याबद्दल शेतकरी बांधवांच्या वतीने आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
आष्टी तालुक्यासाठी अद्यावत तालुका कृषी भावन असावे असे आपले स्वप्न आहे त्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे सूचित केले होते त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून ९ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी विभागाच्या वतीने पाच कोटी ७५ लाख रुपये च्या प्रशासकीय मान्यता आदेश काढण्यात आला आहे यामध्ये तालुका कृषी
अधिकारी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय व कृषी भवन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सर्व सोईयुक्त असे कृषी भवन बांधण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग व इतर संग्रहालयाचाही समावेश करण्यात येणार आहे, शेतकऱ्यांसाठी झटणारे शेतकरी पुत्र म्हणून आमदार बाळासाहेब आजबे यांची ओळख असणारे कर्तव्यदक्ष आमदार आजबे यांनी पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केले आहे, लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामास सुरुवात होणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांना विविध सुविधा या एकाच छताखाली मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून त्यामध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे असे शेवटी आ आजबे यांनी बोलतांना सांगितले.