
- हि
केज मधून आ.नमिताताई मुंदडा यांचा पहिल्याच यादीत समावेश
राज्यातील महायुतीची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आता उमेदवारी यादी प्रसिद्ध होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने या आधीही यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि आजही प्रसिद्ध केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून त्याची घोषणा होणार आहे. महायुतीच्या सर्व जागांचा घोळ मिटला असून काही जागांवर तडजोडी होणे बाकी आहे. तेही सोपस्कार येत्या एक दोन दिवसात पूर्ण होतील. परंतु ज्यांना भाजपा उमेदवारी देणारच आहे किंवा जे उमेदवार फायनल आहेत आणि जो मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणच्या उमेदवार्या जाहिर केल्या जाणार आहेत. भाजपने पहिल्या यादीचा मुहुर्त उद्या शुक्रवारचा काढला असून 110 भाजप उमेदवारांची यादी सायंकाळी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पहिल्या यादीत केज विधानसभा मतदार संघाचा समावेश असून याठिकाणी विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांची उमेदवारी जाहिर होणार आहे. कारण ही जागा मूळ भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय आमदार नमिताताई मुंदडा यासुद्धा फिक्स उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला ‘ग्रिन सिग्नल’ दाखवून प्रचार करण्यासाठी आवश्यक तो कालावधी देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे.
. महायुतीची पत्रकार परिषद काल बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी पार पडली. या पत्रकार परिषदेत महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे प्रमुख नेते उपस्थित होते. या तीन्ही नेत्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार असल्याचे जाहिर केले. शिवाय यावेळी ‘फेक नॅरेटिव्ह’ ला मतदार बळी पडणार नाहीत असे ठणकावून सांगितले.महायुतीची सत्ता आल्यास सर्व योजना सुरु राहतील. त्यामुळे मतदारांनी पुन्हा महायुतीला आपला कौल दिला जाणार असल्याचे तीनही मान्यवरांनी सांगितले. राज्यातील भाजपाचे जे उमेदवार फायनल आहेत किंवा ज्या जागा भाजपा लढणार आहे आणि ज्या जागेचे उमेदवार अंतिम आहेत त्यांना प्रचाराला भरपूर अवधी मिळावा यासाठी भाजपाची पहिली 110 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची यादी उशीरा जाहिर करणे भाजपाला महागात पडले आहे. त्यामुळे यावेळी ती चुक पुन्हा केली जाणार नाही याची दक्षता घेत उमेदवारी यादी उद्या शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उमेदवारी यादी जाहिर केली जाणार आहे.भाजपाच्या वतीने प्रसिद्ध होणार्या पहिल्याच यादीत केज विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. कारण या ठिकाणच्या आ.नमिताताई मुंदडा यांच्या कामाचा सकारात्मक अहवाल पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे.सर्वेक्षणात सुद्धा ही जागा उजवी दाखवली आहे. विकासात्मक कामामध्ये बीड जिल्ह्यात केज मतदारसंघ अव्वल ठरला आहे त्यामुळे त्याचा विचार करुन एक तरुण व उच्च विद्याभुषित, अभ्यासू आमदाराला पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचासुद्धा नमिताताईंच्या नावाला हिरवा कंदील असल्याने उद्याच्या पहिल्या यादीत नमिताताई मुंदडा यांचे नाव असणार आहे. खर्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल परंतु उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्या कामाला गती येत असते त्या प्रमाणे आ.नमिताताई मुंदडा यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.