विधानसभा मतदार संघ गेवराई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचाच उमेदवार असायला पाहिजे, खासदार सुप्रियाताई सुळे सोबत केली चर्चा – अण्णासाहेब राठोड
गेवराई प्रतिनिधी:- विजय चव्हाण

गेवराई प्रतिनिधी – विजय चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट चे कट्टर समर्थक तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड गेल्या काही वर्षापासून गेवराई तालुक्याच्या गोरगरिबांचा कैवारी म्हणून जनतेची विकास रुपी सेवा करत आहेत.
अण्णासाहेब राठोड एक गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना गरिबीचे जान आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता आज विकासापासून वंचित आहेत. हे पाहून त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून अण्णासाहेब राठोड रात्रंदिवस एक करून त्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी सभा संमेलन, आंदोलने, रस्त्यावर येऊन सत्ता हातात नसताना सुद्धा जनतेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढलेले आहेत. आणि न्याय मिळवून दिलेले आहेत.उमेदवारीची अपेक्षा न करता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी मी काम करत आहे. असे ते म्हणतात.
निर्भिड हृदय सम्राट व कट्टर समर्थक अण्णासाहेब राठोड सर्वसामान्य जनतेच्या तना मनात बसलेले आहेत. अण्णासाहेब राठोड सारखा उमेदवार आम्हाला मिळाला पाहिजे असे गेवराई तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चा आहे.
शेतकऱ्यांचा वाली देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी जनतेच्या सुख दुःखासाठी जनतेच्या विकासासाठी उभा आयुष्य घालवला. पवार साहेबांना गोरगरिबांची जाण आहे. पवार साहेब फार दूरपर्यंत विचार करतात आणि विकास करतात हे जनतेला माहीत असल्यामुळे गेवराई तालुक्यामध्ये आपल्याच पक्षाचा उमेदवार असला पाहिजे म्हणून अण्णासाहेब राठोड यांनी खासदार सुप्रिया ताई साहेब यांच्या सोबत चर्चा केली.