राजकीय
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता आयटी ॲप्लिकेशन्सचे प्रशिक्षण संपन्न
मुंबई विभाग संपादक:- संकेत सानप

- ठाणे,दि.20(जिमाका):-* विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समिती सभागृहात FST/SST/VST/ VVT व कंट्रोल रुममधील अधिकारी- कर्मचाऱ्यांना CVIGIL App व ESMS App चे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी आयटी ॲप्लिकेशन्स विषयी मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे व तहसिलदार सायली भगत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.