माजलगाव चा पुतण्या बंड करण्याच्या तयारीत शंभर वाहनांचा ताफा अजित पवारांच्या भेटीला
माजलगाव प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचा अभेद्य पुतण्या म्हणून पाठ थोपटून घेणारे जयसिंग सोळंके जगताप यांची उमेदवारी जाहीर होताच ऍक्शन मोडवर आले असून मला नाहीतर काकालाही नाही म्हणत काल रात्री 100 वाहनाचा युवकांचा ताफा जयसिंग सोळंके यांच्या परवानगीने अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाला आहे.
काका पुतण्याच्या वादात प्रीतम मुंडेची उमेदवारी ?
आ प्रकाश सोळंके व जयसिंग सोळंके या काका पुतण्याचा उमेदवारी वरून सुरु असलेला वाद विकोपाला पोहचला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या दोघांच्या वादात तसेच बाबरी मुंडे व निर्मळ यांना गप्प बसवण्यासाठी माजलगावचीं हक्काची जागा हातातून निसटू नये म्हणून डॉ प्रीतम मुंडे यांची उमेदवारी महायुतिकडून घड्याळ चिन्हवर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही जयसिंग सोळंके बंडखोरी करून अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत. यामुळे माजलगावं मतदारसंघत असलेल्या दीड लाख ओबीसी मतदाराच्या जीवावर डॉ प्रीतम मुंडे देऊन महायुती नवा गेम खेळण्याच्या तयारीत आहे.