राजकीय

रमेशराव आडसकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

माजलगाव प्रतिनिधी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रमेशराव आडसकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज “

Download Aadvaith Global APP

मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून येणारे फोन आणि कालपासून असंख्य लोकांनी भेटून दिलेला विश्वास मला पुढे जाण्याची ताकद देत आहे. ‘आपल्याला लढावंच लागतंय’ आणि ‘या व्यवस्थेला सामान्य नागरिक झुकत नाही हे दाखवून द्यावं लागतंय’ या ठाम मतातूनच आज मी आपला विश्वास घेऊन निवडणूक अर्ज दाखल केला आहे.

ही माझी माजलगावची जनताच माझी खरी ताकद आहे. त्यांच्यासोबतच्या या प्रवासात परिवर्तनाची लढाई आपण सर्व मिळून लढूया. आपलं ध्येय एक आहे – माजलगावचा विकास आणि सामान्य जनतेचा हक्क.”

“या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये मा. आमदार मोहनराव काका सोळंके, मा. आमदार राधाकृष्ण अण्णा होके पाटील, तालुकाध्यक्ष हरिभाऊ बप्पा सोळंके, अशोकराव होके पाटील, बबनराव बप्पा सोळंके, उपनगराध्यक्ष दिपक दादा मेंडके, विठ्ठल दादा लगड, अभय भैय्या होके पाटील, युवा नेतृत्व तन्मय होके पाटील, अँड. सुरेशराव दळवे, नगरसेवक पपु मात्रे, तसेच माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही रॅली परिवर्तनाची सुरुवात असून, बदल हवा नवा या संकल्पनेतून माजलगावच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग उभारला जाईल.”

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये