राजकीय
खा. प्रीतम ताई मुंडे यांना माजलगाव मतदार संघाची उमेदवारी दिली तर माघार अन्यथा निवडणूक लढवणार – माधव तात्या निर्मळ
मुंबई प्रतिनिधी

- मुंबई प्रतिनिधी
आज मुंबई येथे ना.उपमुख्यमंत्री
अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब तिडके.सरपंच. शिवाजीराव काळे.यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये माधव निर्मळ यांना अपक्ष निवडणूक लढवू नका.आपला भविष्यामध्ये चांगला सन्मान करू असे सांगण्यात आले. माञ यावर माधव निर्मळ यांनी अपक्ष लढणार असून आपली भूमिका ठाम आहे असे सांगितले. माजलगाव मतदारसंघांमध्ये मुंडे कुटुंबीयावर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे लोकसभेला अल्पशा मताने पराभूत झाल्या त्यामूळे आजही मतदारसंघातील लोकांच्या मनामध्ये सल आहे.
ही सल भरून काढायची असेल तर खासदार प्रीतम ताई मुंडे यांना माजलगाव मतदारसंघांमध्ये उमेदवारी द्या कुठल्याही अटी शर्ती शिवाय उमेदवारी अर्ज मागे घेतो असे माधव तात्या निर्मळ यांनी सांगितले.