मोहन दादा जगताप यांच्या संवाद मेळाव्यास किट्टी आडगाव सर्कल मधील कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा- अंगद मुंडे
माजलगाव प्रतिनिधी

खबर पक्की मोहन दादा नक्की
माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोहन दादा जगताप यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यात ते मतदारांशी थेट संपर्क साधणार आहेत त्यामुळे या मेळाव्याला संवाद मिळावा असे नाव देऊन मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभेची एक प्रकारे पूर्वतयारी ते करत आहे . या संवाद मेळाव्यास जास्तीत जास्त लोकसंख्येने लोकांनी उपस्थित राहून आपली ताकद मोहन दादा जगताप यांच्या पाठीशी उभी करावी असे आवाहन युवा नेते अंगद मुंडे यांनी केले आहे.
माजलगाव मतदार संघातील भाजपचे नेते मोहन दादा जगताप यांनी कोणत्याही परिस्थितीत येणारी विधानसभा निवडणूक लढवायची असा निर्धार केला असून त्या अनुषंगाने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कार्यकर्ता मेळावा दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केला आहे. निर्धार नव्या पर्वाचा, खबर पक्की मोहनदादा नक्की , असा निर्धार करून मोहनदादा जगताप या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या अनुषंगाने 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जुना मोंढा मैदान माजलगाव येथे या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद मेळाव्यास किट्टी आडगाव सर्कल मधील कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते अंगद मुंडे यांनी केले आहे.