
विधानसभेचे उमेदवार प्रा.ईश्वर मुंडे किर्तनाच्या फडात
किल्ले धारूर दि.१५( प्रतिनिधी) महाराष्ट्रात विधान सभा निवडणूकीची धामधूम चालू आहे तसी माजलगाव मतदार संघात ही सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ चालू आहे परंतू आवड आसली की सवड मिळते म्हणतात याचा प्रत्यय काल सर्वांना आला.
माजलगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे गांजपूरकर हे रूई घारूर येथे किर्तनाच्या फडात सर्वांना दिसून आले.
रूई धारूर येथील श्री राजेंद्र काकडे व श्री महारूद्र भोसले यांच्या आत्या स्व.गजराबाई मुकुंद हांडगे यांच्या प्रथम वर्ष श्राध्दा निमित्त दि.१४ नोव्हेंबर २०२४ गुरूवार रोजी ह.भ.प.प्रा.ईश्वर मुंडे महाराज गांजपूरकर यांच्या किर्तनाचे नियोजन एक महिन्यापूर्वीच केलेले होते.निवडणूकीच्या धामधूमीत स्वत: अपक्ष उमेदवार असलेले प्रा.ईश्वर मुंडे सदरील किर्तन सेवेसाठी वेळ देतील किंवा नाही या बाबत संभ्रम निर्माण झालेला होता परंतू निवडणूका येतील,निवडणूका जातील पण आपला सांप्रादायीक सेवेतील भाव व आपल्या प्रेमाच्या माणसांतील आपलेपणा टिकून राहावा म्हणून प्रा.ईश्वर मुंडे यांनी राजकारणाचा फड सोडून किर्तनाच्या फडात सेवा देण्यास प्राधान्य दिले.
संत तुकाराम महाराज यांच्या *नको नको मना गुंतू माया जाळी।काळ आला जवळी ग्रासावया* या अभंगावर अभ्यासपूर्ण किर्तन केले.त्यांना प्रा.राम नांदूरे यांनी मृदंगाची साथ दिली तसेच ह.भ.प.दत्तात्रय कदम महाराज,शिवाजी गायके महाराज,चंद्रहार गायकवाड,हनुमंत तिडके,धनराज सोळंके,सुमित भोसले यांनी गायनाची साथ केली.मनोज खिंडरे यांनी किर्तनाचे स्वर या युट्यूब चॅयनल वर टेलीकास्ट केले.
प्रा.ईश्वर मुंडे यांनी राजकारणापेक्षा सांप्रादायीक सेवेला महत्व दिल्यामुळे मतदार संघातील लोकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर वाढला आहे.