नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येवला येथील संपर्क कार्यालयात संपन्न झाली
येवला नाशिक प्रतिनिधी

मुंबई विभाग संपादक:- संकेत सानप
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येवला येथील संपर्क कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभीच पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा उमेदवारी करण्याच्या झालेल्या आग्रहाचा स्वीकार करत असल्याने मंत्री छगन भुजबळ साहेब उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या संकटातून मार्गक्रमण करीत यातून वाट काढणाऱ्या आपल्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाला सर्वांगीण दृष्टीने सर्वोत्तम बनविण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून आपण झगडत आहोत. आगामी काळात यापेक्षाही सर्वोत्तम आणि समृद्ध मतदारसंघ म्हणून येवल्याला ओळख मिळवून देणार असून मतदारसंघात सुरु असलेला विकासरथाचा प्रवास हा पूर्णविराम नाही, तर अल्पविराम असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत भाजप नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांच्याकडे प्रचारप्रमुख पदाची धुरा सोपविण्यात यावी, अशी सूचना मांडली. त्यास येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर व तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वासराव आहेर, अरुण थोरात, शेखर होळकर, अशोकराव नागरे, सुवर्णा जगताप, मोहन शेलार, एलजी कदम, गणपतराव कांदळकर, दत्तू पाटील डुकरे, दत्तात्रेय रायते, भाऊसाहेब बोचरे, भाजपा तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे, शिवसेना नेते किशोर सोनवणे, राजू परदेशी, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, विनोद जोशी, बबनराव साळवे, शिवाजी सुपनर, मच्छिंद्र मोरे, विनायक भोरकडे, अण्णा दौंडे, डॉ.बेलावडे, राजू कांबळे, जमील शेख, चंद्रकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.