
माजलगाव मतदार संघात माधव निर्मळ यांनी अडवली प्रस्थापितांची वाट
अपक्ष उभे राहिले तरी विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार
माजलगाव विधानसभा मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपला किंचितशी साथ दिली. जवळपास 900 मतांची आघाडी दिली. मुळात या मतदारसंघात भाजपने सुद्धा आघाडी मिळणार नाही असा अंदाज बांधला होता कमीत कमी 25 हजार मतांची आघाडी तुतारीला मिळेल असे गृहीत धरले होते.पण तेथील महायुतीच्या नेत्यांनी वज्रमूठ सैल होऊ दिली नाही आणि भाजपाला 900 आघाडी मिळवून दिली. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे) आमदार असल्याने ही जागा त्यांनाच सुटेल अशी अपेक्षा आहे. परंतु भाजपाकडून लढण्याची तयारी अनेकांनी दर्शवली आहे. महायुतीमध्ये तसे होईल का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. पण या गदारोळात या मतदारसंघातून समाजसेवक माधव निर्मळ यांनी जनमानसात आपले वलय निर्माण करून प्रस्थापितांची वाट अडवून टाकली आहे. प्रस्थापितांच्या लढाईत माधव निर्मळ यांनाच विजयी करण्याचा निर्धार सामान्य मतदारांनी केला आहे.राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली तर मिळाली तर ठीक अन्यथा अपक्ष लढलात तरी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही मतदार देऊ लागले आहेत त्यामुळे प्रस्थापितांची वाट आगामी काळात बिकट होणार आहे.
. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी खूप सारे इच्छुक आहेत. पण पुढे यायला कोणीही तयार नाही पैलवान घरातच तेल लावून बसत आहेत. सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर खूप वेगळी झालेले आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आता त्यांचीच टिमकी वाजवण्याची वेळ पक्षांनी व नेतृत्वांनी इच्छुक उमेदवारांवर आणली आहे. गेल्या 5 वर्षात करोडो रुपये पाण्यात घालून काही फायदा होणार नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे. या मतदारसंघाने लोकसभेला पंकजाताईंना तारल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातून भाजपाला व विशेषतः पंकजाताईंना आघाडीच काय उलट 25 हजारांनी हा मतदार संघ मायनस होईल असे राजकीय तज्ञ सांगत होते. व तशी परिस्थिती सुद्धा होती. कारण आ. प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला असो की, त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना मिळालेले जोरदार समर्थन असो त्यामुळे पंकजाताई मुंडे २५ हजारांनी पिछाडीवर राहतील असे सांगितले जात होते. मात्र नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वज्रमूठ पक्की करून भाजपाला नऊशे ९०० मतांची आघाडी मिळवून दिली.आता विधानसभेचे वारे कशा पद्धतीने वाहते? याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक जण उत्सुक आहेत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या ठिकाणी आग्रही आहे. महायुतीच्या सूत्राप्रमाणे या ठिकाणी विद्यमान आमदारास व राष्ट्रवादीला ही जागा सुटेल असे सांगितले जाते. मात्र रमेशराव आडसकरांनी अद्यापही आशा सोडलेली नाही.शेवटच्या घटकेपर्यंत ‘ काहीही ‘ होऊ शकते यावर आडसकरांचा विश्वास आहे आणि त्याची अनुभूती यापूर्वी अनेक वेळा आडसकरांना आलेली आहे. म्हणूनच रमेशराव आडसकर हे आजही भाजपातच तग धरून बसले आहेत. जे करतील ते पंकजाताई करतील असे ते कार्यकर्त्यांना सांगत असतात. इकडे समाजसेवक माधव निर्मळ यांनी आपली गाडी दामटण्यास सुरुवात केली आहे.’आये तो तुम्हारे साथ, और ना आये तो तुम्हारे सिवा ‘ हा नारा देऊन त्यांनी यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. डोंगरदऱ्यात,वाडी वस्ती आणि तांड्यांवर जाऊन आपणच उमेदवार आहोत असे सांगत आहेत.मतदारांनी सुद्धा नवा प्रयोग म्हणून प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी माधव निर्मळ यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. ठिकठिकाणी निर्मळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. लोकसभेच्या पराभवाचा उट्टा काढण्यासाठी ओबीसी समाज बांधव अधिक आक्रमक झाला आहे.
त्यामुळे माजलगावात निर्मळ यांना एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी ते अपक्ष म्हणून निवडून निवडून येतील एवढी ताकद या ठिकाणी उभी टाकली जात आहे. प्रस्थापितांना कायमचे घरी बसवण्याची नीती अमलात आणण्यासाठी मतदार राजा एक झाला आहे.माधव निर्मळ हा सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून अत्यंत मेहनतीतून, कष्टातून आणि परिश्रमातून ते उभे राहिलेले आहेत.आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची राज्यभर प्रतिमा आहे.अशा यशस्वी उद्योजकाच्या पाठीशी उभे राहून या मतदार संघाचा विकास करण्याची भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी घेतली आहे. वाड-वडिलांची पुण्याई आणि समाजातील थोरा- मोठ्यांच्या आशीर्वादावरच प्रस्थापितांना ‘ दांडू ‘ लावला जाणार आहे. निर्मळ यांची उमेदवारी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी ठरणार आहे.त्यामुळे माधव निर्मळ हा एक सक्षम पर्यायमाजलगाव मतदारसंघात निर्माण झाला आहे.