
परळीचा वाघ *धनुभाउनी आज आपला उमेदवारी अर्ज
दाखल केलायावेळी आज आ.पंकजाताई, डॉ.प्रीतमताई यांच्यासह लाडक्या बहिणींच्या सोबतीने परळी विधानसभा निवडणुकीसाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सकाळी आमच्या बाईंनी औक्षण करून आशीर्वाद दिले. नाथ्रा गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन, गोपीनाथगडावर स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतींना तसेच कन्हेरवाडी परिसरात स्व.अण्णांच्या स्मृतींना वंदन केले. आ.पंकजाताई व डॉ.प्रीतमताई यांनीही औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
प्रभू वैद्यनाथांचे आशीर्वाद घेऊन, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या निवडणुकीला आपण आजवर केलेली कामे लोकांत घेऊन सामोरे जाणार असून, सबंध परळीकर जनता आपल्या या पुत्राला पुन्हा एकदा आशीर्वाद देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला