माजलगाव विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार – प्रा.ईश्वर मुंडे

धारूर (प्रतिनिधी) देशाचे नेते पद्म विभुषण खा.शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेऊन राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घारूर तालुकाक्षध्य,ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस,सेवा निवृत्त अधिकारी सेल राज्य प्रमुख या पदावर पक्षाचे सक्रीय काम करून खा.शरदचंद्र पवार साहेबांचे व पक्षाचे विचार वाडी,वस्ती, तांड्यापर्यंत पोहचवले.सन.२०१९ ला माजलगाव मतदार संघाचा आमदार निवडून आनला.पक्ष फुटल्यानंतर ही निष्ठेने खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातच राहीलो.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून जन सामान्यांच्या मनात घर केलेले आहे.
मागे सन २०२१ ला छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदार संघात उमेदवारी मागणी केलेली होती,२०२४ ला बीड लोकसभा मतदार संघात जनसंपर्क वाढवून बीड लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली होती.वरील दोन्ही वेळी मला पक्षाने आपला नंतर विचार करू असे सांगून थांबवले.
आता सन २०२४ च्या माजलगाव विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करून माजलगाव मतदार संघातील शंभर गावात जन संवाद दौरा करून पक्षाचे कार्य वाढवलेले आहे.माझ्या परिचय पत्राच्या पन्नास हजार प्रति मतदार संघातील सर्व गावांमध्ये वाटप केलेल्या आहेत.
या वेळी माजलगाव मतदार संघात माझ्या विषयी मतदारांमध्ये सहानुभूती असून पक्षाने आपणास संधी द्यावी अशी जन भावना होती. या मुळे मी निश्चित निवडणूक जिंकू शकत होतो.परंतू असे न होता मला पक्षाने निवडणूक लढण्याची संधी व तिकीट दिले नाही.
या मुळे मतदार संघातील जनता नाराज झालेली असून तुम्ही अपक्ष निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हा दबाव माझ्यावर वाढत असल्यामुळे मी माजलगाव विधानसभा मतदार संघ निवडणूक – २०२४ जनतेच्या विश्वासावर अपक्ष लढवणार असून सोमवार दि.२८ ॲाक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.