राजकीय

बीड लोकसभेच्या निकालात नवा ट्विस्ट, बजरंग सोनावणेंना हायकोर्टाची नोटीस, निवडणूक रद्द होणार?

बीड प्रतिनिधी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

बीड : बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावली आहे. वाढलेली मतदान केंद्र, शपथपत्रात खोटी माहिती आणि प्रत्यक्ष मतमोजणीवर या याचिकेतून आक्षेप घेण्यात आले आहेत.

Download Aadvaith Global APP

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून बीडचे खासदार बनलेल्या बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती ए.एस. वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तीनी दिले आहेत, त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बीडचे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी अॅड. शशिकांत शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे.

 

बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.

 

दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसंच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ केंद्र वाढवले गेले, त्यामुळे 4,261 लोक मतदानापासून वंचित राहिले. हे बुथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत तसंच या पोलिंग बुथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे.

माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेले नाही. तसंच वैध असणारे 1156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलं आहे. तसंच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहे. तसंच प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या मुद्द्यांवर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केलं आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथ पत्रात तसा उल्लेख केला नाही, त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे.

 

बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए, 140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 बुथ अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये