महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता

केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रांमार्फत खरेदी करण्यात येतील. सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रतिक्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचा मनापासून आनंद होतो आहे. याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार!