माजलगाव तालुक्यातील विविध गणेश मंडळांची माधव तात्या निर्मळ यांच्या हस्ते आरती
मुख्य संपादक- प्रदीप मुंडे

आज माजलगाव तालुक्यातील विविध गणेश मंडळांची माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते *मा.श्री.माधव तात्या निर्मळ* यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
लवुळ_क्र_१ :- ओंकारेश्वर गणेश मंडळांची आरती केली यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व तरुण,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खानापूर :- यशवंत गणेश मंडळ खानापूर,येथे श्री गणेशाची आरती केली यावेळी गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रम्हगाव :- जगदंब गणेश मंडळ ब्रह्मगाव येथे श्री गणेशाची आरती करून अध्यक्ष उपाध्यक्ष गावचे सरपंच नारायणराव भले, उपसरपंच राधे कांबळे व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.
केसापुरी कॅम्प :- एक गाव एक गणपती असा स्तुत्य उपक्रम गरुडा गणेश मंडळ केसापुरी कॅम्प यांनी राबविला, त्याबद्दल अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व गावकरी मंडळीचे अभिनंदन केले.सर्वांनी आपल्या उपक्रमाचा आदर्श घेऊन एक गाव एक गणपती बसविणे असे आव्हान केले व श्री गणेशाची महाआरती केली,यावेळी गावातील तरुण मंडळीसह महिला माऊली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोबत मा सभापती जि प कल्याण भाऊ आबूज, युवा नेते कल्याणराव शेप, सरपंच शिवाजीराव काळे आदि उपस्थित होते.