
ठाणे (प्रतिनिधी) अमित देसाई
ठाणे येथील भांडारअळी नऊ वर्षांच्या चिमुरड्या मुलीबरोबर गैरकृत्य करणाऱ्या आरोपी सचिन यादव याच्यावर पोक्सो अंतर्गत कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे नगर पोलिस वरिष्ठ निरीक्षक श्री. विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली.
आरोपी नराधम सचिन यादव याला जामीन मिळाला असून, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणी केली.
या वेळी भाजपाच्या ठाणे जिल्हाअध्यक्ष श्री संजयजी वाघुले,नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी,जिल्हाउपाध्यक्ष जयेंद्रजी कोळी,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, नौपाडा मंडल अध्यक्ष श्री. विकास घांग्रेकर, नौपाडा मंडळ युवा मोर्चाच्या अध्यक्ष राहुल कुंड, ,नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले ,प्रभाग अध्यक्ष प्रतिक सोलंकी , अन्वेश जयगडकर, शुभम गुप्ता, नितेश तेली, रश्मी मोरे, मीनाक्षी मिस्त्री, अरुणा कांबळे, निखत सारंग, अंजली भालेराव, सुनीता भोईर, यांच्यासह मोठ्या संखेने स्थानिक महिलांची उपस्थित होत्या त्यांनी प्रचंड आक्रोश केला.