राजकीय

गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये अण्णासाहेब राठोड सक्षम उमेदवार

गेवराई प्रतिनिधी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

 

Download Aadvaith Global APP

 

गेवराई प्रतिनिधी विजय चव्हाण –

 

सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटनेतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक पक्षांमध्ये त्यागी समर्पित व धडाडीचे नेते काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट प्रदेश स्तरावर तळमळीने काम करीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे संघर्ष नेते अण्णासाहेब राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट गेवराई विधानसभेत उमेदवारी देऊन समस्त गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी समाजाला राजकीय न्याय द्यावा अशी मागणी गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी 18 पगड जातीतील जनता शरद चंद्र पवार साहेब यांच्याकडे करत आहेत

 

गेवराई विधानसभा मतदारसंघात बंजारा ओबीसी भटके मुक्त व अठरापगड जातीमध्ये अण्णासाहेब राठोड हे सर्वाधिक चर्चेतील चेहरा म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट समाजाच्या संघर्ष शील व ते कट्टर समर्थक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट च्या वरिष्ठ नेत्यासोबत त्यांचे थेट संबंध आहेत. ओबीसी,भटके विमुक्त , आदिवासी अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून मागील वर्षापासून अण्णासाहेब राठोड संघर्ष करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अण्णासाहेब राठोड सर्व दूर परिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चे विविध कार्यक्रम,मेळावे, सभा, अधिवेशन त्यामध्ये विशेष भाग घेत आले आहेत. तसेच अलीकडे संपन्न झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अण्णासाहेब राठोड यांनी दोन महिने रात्रंदिवस प्रचंड मेहनत करून लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी गाव,वाडी,वस्ती तांड्या वर दौरे करून समाजाचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार गटाकडे वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहे. या कामे त्यांना पूर्ण यश आले असून जिल्ह्यातील बंजारा व ओबीसी समाज बांधवांनी 90% पेक्षा जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या पारड्यात टाकण्याचं काम केलं आहे. व मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे काम अण्णासाहेब राठोड यांनी केले आहे. अशा हरहुन्नरी कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांनी गेवराई विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवारी देऊन राज्यातील बंजारा समाज व गेवराई विधानसभेतील ओबीसी समाज किंवा मुक्त विमुक्त जाती धर्म व सर्व जाती धर्मातील मराठा बांधवांना सामाजिक व राजकीय न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे

उमेदवारी दिल्यास राज्यासह मराठवाड्यातील बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असेल व 48 विधानसभा मतदारसंघातील लाख पंचायत समिती मतदान असलेल्या बंजारा बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील समाजाचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गट व मित्र पक्षांचे उमेदवारांच्या पारड्यात पडेल पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गट व सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी मदत होईल अशी प्रतिक्रिया जनकाराकडून व्यक्त करण्यात येत आहे

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये