ताज्या घडामोडी

थेटेगव्हाण ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

 

Download Aadvaith Global APP

 

धारूर दि. २३ (प्रतिनिधी):-

 

धारूर तालुक्यातील थेटे गव्हण हे गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२३-२४ या स्पर्धे त जिल्हाभरातील शेकडो ग्राम पंचायत नि सहभाग नोंदवला होता. धारूर तालुक्यातील थेटेगव्हाण ग्रामपंचायतने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय तपासणी मध्ये जिल्हाभरातून थेटेगव्हाण ग्रामपंचायत प्रथम गुणांकासह संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अव्वल आली आहे. थिटेगव्हाण चे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

सध्या अनेक ठिकाणी स्वच्छते अभावी रुग्णसंखेत वाढ होत आहे. अनेक ग्रामपंचायत मध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जात नसल्याने त्या त्या गावात प्रचंड मोठ्या प्रमाणावर

 

रोगराई आणि दैनंदिन समस्या उद्भवत आहेत. यामुळे राज्य शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना राबवत ग्रामीण भाग स्वच्छ आणि समृद्ध करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असतात. जिल्हाभरातील शेकडो ग्रामपंचायत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात परंतु अंतिम स्पर्धेपर्यंत काही मोजक्याचग्रामपंचायत या स्पर्धेत टिकून राहतयशस्वी होतात. याच पद्धतीने घेण्यातआलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान स्पर्धेत धारूर तालुक्यातील थेटेगव्हाण या ग्रामपंचायतने सहभागघेतला होता. गावचे सरपंच भाऊसाहेबचव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायतसदस्यांना गावकऱ्यांना विश्वासात घेऊनग्राम स्वच्छतेचा विचार बोलून दाखवत

 

ही स्पर्धा जिंकायची आहे आणि फक्त स्पर्धा जिंकायची नसून गावकऱ्यांच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक सम स्येवर मात करण्यासाठी आरोग्य सक्षम असले पाहिजे त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याचं गावकऱ्यांना पटवून दिले आणि या स्पर्धेत सहभाग नोंदवत अंतिम टप्प्यापर्यंत थेटेगव्हण ना ग्रामपंचायत या स्पर्धेत टिकून

 

राहिली. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत निवडीमध्ये थेटेगावण ग्रामपंचायत ने जिल्हाभरात बाजी मरत अव्वल क्रमांक पटकावून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ या स्पर्धेची जिल्हास्तरीय तपासणी झाल्यानंतर विशेष पुरस्कार प्राप्त प्रथम द्वितीय आणि तृतीय ग्राम पंचायत निवडण्यात आल्या. यामध्ये थेटेगव्हाण ग्रामपंचायत ने प्रथम क्रम ांक पटकावल्याने सर्व स्तरातून सरपंच भाऊसाहेब चव्हाण तसेच गावकऱ्यांवर शुभेच्छा दिल्या जात आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी सरपंच भाऊसाहेब चव्हाण, ग्रामसेवक प्रीती शिंदे, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य गावकरी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धे चे नियम आणि महत्व समजावून सांगण्यासाठी गटविकास अधिकारी संतोष वंगवडे तसेच विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये