
- बीड प्रतिनिधी सुरेश आण्णा धस साहेब यांच्या घरातील फोटो सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करतानाथोडा वेळ बाजूला ठेवला असेल…
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची स्थान आमच्या हृदयात आहे निवासस्थानातील सदैव स्फूर्तीदायी असलेला फोटो बंगल्यातील रंगरंगोटी करताना काही वेळ घरातच काढून ठेवला आणि काही नटदृष्ट राजकीय द्वेषींनी या बाबत द्वेष पसरवण्याचे काम केले आहे आणि माझ्यावर विनाकारण आरोप करत स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचा फोटो माझ्या घरातील भिंतीवरून काढण्यात आला असल्याचे फोटो व्हायरल करण्यात आले.
मात्र ज्यांनी कुणी या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठीच खरंच मुंडे साहेबांचा फोटो काढला आहे का ? याची शहानिशा करणे गरजेचे होते.हजारो लोकांचा दैनंदिन भेटीसाठी आपल्या कामासाठी माझ्याकडे ये जा असते त्या सर्व गोरगरीब ऊसतोड कामगार आणि कष्टकरी जनतेला हे चांगले माहीत आहे की,आणि ज्यांना माहीत नाही त्यांना देखील मी सांगू इच्छितो की माझ्या घराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.त्यामध्ये रंगरंगोटीचे काम आणि किरकोळ फर्निचर काम चालू आहे त्यामुळे साहजिकच वस्तू आणि साहित्य इकडे तिकडे तिकडचे इकडे झाले असेल पण सद्यस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर असताना नाहक कुणीतरी याचा विपर्यास करून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असे गलिच्छ आणि खालच्या पातळीवरील राजकारण करत असेल तर खरोखरच राजकारणाची पातळी इतक्या खालच्या स्तरावर जाईल असे कधीही वाटले नव्हते.अस सुरेश आण्णा धस यांनी बोलून दाखवले