प्रा.ईश्वर मुंडे यांच्या गाव भेट दौऱ्याची शंभरी तुतारी पोहचवली घरो घरी अन बाजारा बाजरी
धारूर प्रतिनिधी

धारूर.(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कांही दिवसावर येऊन ठेपली आहे.माजलगाव मतदार संघात पावसाने वातावरण गारे गार केलेले आसले तरी महा युतीचे घड्याळ कोणाला मिळेल? महा विकास आघाडीची तुतारी कोणाला मिळेल ? खा.शरद पवार यांना कोण कोण भेटले या चर्चेने वातावरण गरम झालेले आहे.
तुतारी कडे कोण येणार अन तुतारी कोणाला भेटणार या चर्चेत न आडकता माजलगाव विधानसभा मतदार संघात आपल्यालाच उमेदवारी भेटेल व आपणच तुतारी वाजवू या अपेक्षेने प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे हे मात्र पायाला भिंगरी बांधून माजलगाव मतदार संघ पिंजून काढत आसल्याचे चित्र दिसत आहे.
बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नौकरी करून खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेऊन सक्रीय समाजकारण व राजकारण करणारे प्रा.ईश्वर मुंडे बीड लोकसभा निवडणूकीच्या वेळी उमेदवारीच्या चर्तेत आलेले होते.
माजलगाव मतदार संघाचे शेवटचे टोक व आपले स्वत:चे गाव गांजपूर येथून आपल्या आई-वडीलांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या गाव भेट दौरा कार्यक्रमाने मतदार संघातील धारूर व वडवणी तालुक्यांतील शंभर गावे पूर्ण केलेली आहेत.
आपल्या गाव भेट दौऱ्याचा फार गाजावाजा न करता, किती मानसे उपस्थीत राहतील याची काळजी न करता, शक्य होतील तेवढेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत घेऊन सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेचे नियोजन करून गावा गावात जाणे,मंदीरात दर्शन घेणे,घरोघरी भेटणे, दुकान,टपरी,हॅाटेल,,बाजारात भाजी पाला विकणारे शेतकरी, खेळणी,भांडे व खाऊचे पाल,रस्त्याने ये -जा करणारी मानसे यांना आदरपूर्वक नमस्कार करणे,विधानसभा निवडणूक,खा.शरदचंद्र पवार,आ.जयंत पाटील,पक्षाची भुमिका व तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षाचे निवडणूक चिन्ह सांगत आपल्या परिचय पत्राची छापील पॅाम्पेट हातात देवून पुढे चालणे असा प्रवास चालू आहे.
माजलगाव मतदार संघात महा विकास आघाडीची उमेदवारी कोणाला भेटेल हे लवकरच जाहीर होईल परंतू खा.शरदचंद्र पवार हे सोशल इंजिनिअरींग चा प्रयोग करतील व उमेदवारी आपल्यालाच मिळेल,आपणच लढू व जिंकू या आत्मविश्वासाने प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे माजलगाव मतदार संघ पिंजून काढत आहेत.उच्च शिक्षित,प्रशासकीय सेवेचा अनुभव,चारित्र्य संपन्न व सतत हास्य वदनी नवीन चेहऱ्यास जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.