राजकीय
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील धनंजय मुंडे यांची पहिली सभा शेजारी बाबासाहेब पाटलांसाठी!
अहमदपूर

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील धनंजय मुंडे यांची पहिली सभा शेजारी बाबासाहेब पाटलांसाठी!
आज अहमदपूर येथे महायुतीचे उमेदवार आ.बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस संबोधित केले. यावेळी महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, तरुणाई आदी घटकांसाठी केलेल्या कामांवर व विविध लोककल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकला.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे व महायुतीने सुरू केलेल्या सर्व योजना अबाधित रहाव्यात तसेच अहमदपूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बाबासाहेब पाटलांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपस्थित जनसमुदयास कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी केले