एकादशी सोशल वेल्फेअर फाउंडेशन द्वारा आयोजित दिवाळी स्नेह मिलन व सत्कार सोहळा शेलू शहर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सिद्धेश्वर केंद्रे

दिनांक 12/ 11 /2024 ला एकादशी वेल्फेअर फाउंडेशन द्वारा आयोजित
संताजी मंगल कार्यालय सेलू येथे दिवाळीनिमित्त सर्व मित्रमंडळींची व सामाजिक कार्यकर्ते गाठीभेटी होऊन जुन्या आठवणी उजळा देण्यात संधी प्राप्त झाली या निमित्य सेलू तालुक्यातील सर्वसामाजिक कार्यकर्ते सहपरिवासह शेकडोच्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले श्री अतुल दादा शेळके माहेर शांती निवास शेलु ( प्रकल्प प्रमुख ), श्री अभय दादा लांबट (अध्यक्ष) द हेल्पिंग हँड्स फॅमिली वरुड रेल्वे सेवाग्राम , श्री गणेश जी इखार(अध्यक्ष) महालक्ष्मी फाउंडेशन वर्धा , सौ दीपमाला ताई मालेकर(अध्यक्ष) सर्वधर्मसमभाव कलामंच वर्धा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक क्षेत्रात काम कसे करायचे युवा मित्रमंडळींना व महिला वर्गाला समाजसेवेसाठी आपण आपला वेळ देऊन समाजसेवेतून राष्ट्रसेवा आपण मिळून करूया असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आरोग्य मित्र, रुग्णमित्र,सर्पमित्र, शिक्षण सल्लागार व विविध सामाजिक सेवा देणारे यांचा सन्मानपत्र देऊन मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला एकादशी सोशल वेल्फेअर फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष श्री लिलाधर अरुणराव कोंबे, रोहित सुपारे, वैभव वानखेडे, सौरभ पोहाने, अक्षय माकाळकर, सागर खोपडे, रोशन माहुरे, इम्तियाज अली व समस्त एकादशी फाउंडेशन यांनी आयोजन करून मोठ्या उत्साहात पार पाडला